<
जनरल बिपिन रावत आणि सोबत अपघातात मृत्यु पावलेल्या वीर योध्याना श्रद्धांजली अपर्ण करतांना मान्यवर व विद्यार्थी
फैजपूर – (प्रतिनिधी) – येथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात काल झालेल्या एम आय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टर अपघातात चीफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत सहित 13 जणांच्या अपघाती निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण भारताला शोकसागरात बुडवून टाकणाऱ्या अत्यंत हृदयद्रावक घटनेने प्रत्येक भारतवासीयाचे मन पिळवटून गेले. शैक्षणिक वर्तुळातूनही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. महाविद्यालय फक्त डिग्री उपलब्ध करुन देणारी संस्था नसून सामाजिक भान आणि देशप्रेम जागवनारी केंद्रे आहेत
म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात श्रद्धांजलीपर शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी चीफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाबद्दल मनोगत व्यक्त केले. देशाची आन, बाण व शान असलेल्या, दुश्मनाच्या हृदयाचा ठेका चुकवणाऱ्या व अत्यंत धाडसी देशभक्ताचा मृत्यू म्हणजे देशाचे मोठे नुकसान झाले असून, ” मी माझ्या जवानांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही” असे ठामपणे सांगणाऱ्या लष्कर प्रमुखाला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या सांगण्यानुसार, “प्रत्येक भारतीयाने जर आपली कर्तव्य पार पाडली तर देशातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्नच उद्भवणार नाही या वक्तव्याचा उल्लेख करून उपस्थितांना देशाप्रती जबाबदारी ची उत्कट जाणीव करून दिली.
यावेळी उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जी जी कोल्हे, फिजिकल डायरेक्टर डॉ जी एस मारतळे, कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचे समन्वयक व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ एस व्ही जाधव, प्रा व्ही सी बोरोले, प्रा डॉ मनोहर सुरवाडे, डॉ जे जी खरात, प्रा हरीश नेमाडे, प्रा डॉ पी डी पाटील, प्रा.डॉ. राजश्री नेमाड़े, डॉ. सविता वाघमारे, डॉ. योगेश तायडे, डॉ राकेश तळेले, प्रा. अचल भोगे, डॉ. विजय सोन्जे, प्रा. मच्छिंद्र पाटील, फौजी पाटिल दादा, आर. एस. सावकारे, राजेंद्र तायडे, नितीन सपकाळे, सिद्धार्थ तायडे, ललित पाटील, प्रमोद अजलसोंडे, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.