<
अमळनेर – पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुंन्नुर येथील दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील वीरगती प्राप्त झालेल्या सर्व शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. अस्मिता सरवैया यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार बद्दलची असलेली भूमिका स्पष्ट केली. प्रा.डॉ. जगदीश सोनवणे यांनी मूलभूत अधिकार व कर्तव्य यावर मार्गदर्शन करून सर्वांच्या मूलभूत अधिकारावर बाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मानवाधिकारा बाबत असलेल्या संविधानिक तरतुदी, कायदे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक संदेश सदांशिव व नेहा बोरसे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग तसेच महाविद्यालयातील प्रा.विजयकुमार वाघमारे, डॉ. जे. एस. सोनवणे, डॉ.भरत खंडागळे, डॉ. श्वेता वैद्य, डॉ. एस आर चव्हाण, कार्यालयीन अधिक्षक श्री अनिल वाणी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.