<
जळगाव, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) :- राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आलेले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्हयामधील कंपन्या या मेळाव्यात वेगवेगळया प्रकारची रिक्तपदे नोंदवत आहेत. सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी 12 ग्रॅज्युएट / डिप्लोमा/ एम ई / बी ई / काम्प्यूटर ऑपरेटर/ आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 500 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.
या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, तसेच अल्पसंख्याक उमेदवारांणी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्य रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग – ईन करुन ॲप्लाय करावा.
काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्य आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता वि. जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.