<
जळगाव(प्रतिनिधी)- चाळीशीच्या आतील व्यक्ती अपघातात अतीरक्तस्त्रावाने मृत्युमुखी पडतात. शरीरातील रक्तस्त्राव थोपविण्यासाठी आम्ही बहूवारीक (पॉलिमर) नवीन औषधी विकसीत करत आहोत. हे औषध रक्तस्राव होण्याच्या ठिकाणी जाऊन रक्तस्राव थांबवतो. कमी खर्चात या औषधामुळे आम्ही शरीरातील अडथळे दूर होऊ शकतात. विज्ञानात प्रगती साध्य करण्यासाठी जिज्ञासुवृत्ती, चिकाटी, चिकित्सक वृत्ती असायला हवी.
अनेकवेळा अपयश येते, त्याची तयारी ठेवायला हवी, ९० टक्के वेळा अपयश येते, पण त्या १० टक्के यशासाठी काम करीत राहायचे असते. घेतलेले काम तडीस न्यायचे असे आवाहन बॉस्टनच्या हार्वर्ड विद्यापीठात संशोधन व अध्यापक समीर मित्रगोत्री यांनी आवाहन केले. मराठी विज्ञान परिषद – मध्यवर्ती, मराठी विज्ञान परिषद – जळगाव विभाग व जैन इरिगेशनतर्फे आयोजित ५६ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात ते बोलत होते.
यावेळी अधिवेशनाचे उद्घाटक अशोकभाऊ जैन यांचेही उद्घाटनपर भाषण, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील यांचेही भाषण झाले. जैन हिल्स येथे आयोजित तीन दिवसीय अधिवेशनास 50 निमंत्रितांसाठी प्रत्यक्ष व इतरांसाठी ऑनलाईन वेबेक्स, यूट्युब सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील विज्ञानप्रेमींचा सहभाग आहे. जैन हिल्स बडीहांडा सभागृहात औपचारिक उद्घाटन झाले. उद्घाटक अशोक जैन, स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील, अ.पां. देशपांडे, जळगाव विभाग कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्रसिह पाटील, कार्यवाह दिलीप भारंबे व्यासपीठावर होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने औपचारिक उद्घाटन झाले. उद्घाटक जैन इरिगेशनेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, ‘हे शरीरही एक प्रकारचे नाजूक यंत्रच आहे हे कळल्यावर मी कसं काय त्याचा विरोध करू शकतो?.. माझा विरोध यंत्राला नाही, तर यंत्राच्या मागे धावण्याला आहे.
सगळ्यात महत्त्वाचा आहे माणूस.’ असे म्हणणारे मोहनदास करमचंद गांधी यांचा सामान्यत्त्वाकडून असामान्यत्त्वाकडे झालेला प्रवास आपणा सर्वांना ठाऊक आहेच. एकूणच महात्मा गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाविषयी अनेकांची वेगवेगळी मते असू शकतात मात्र तेही विज्ञाननिष्ठ होते हे निश्चित! आधुनिक जगाचे वास्तविक ज्ञानसुद्धा या महात्म्यास झाले. त्यातूनच त्यांनी विज्ञानाविषयी त्यांचे विचार, धारणा, दृष्टिकोन बाळगला अगदी प्रांजळपणे सांगायचे तर त्यांच्या आत्मचरित्राचे शीषर्क ‘सत्याचे प्रयोग’ हे आहे. आयुष्य हाच एक प्रयोग मानणाऱ्या महात्मा गांधीजींच्या स्मरणाने मराठी विज्ञान परिषदेची सुरवात करूया असे आवाहन केले.
“विज्ञानाने बुद्धी विशाल आणि धारदार होते, तर अध्यात्माने हृदय आणि आत्माही सुसंस्कारित होतो.’’ श्रद्धेय मोठ्याभाऊंनी कृषीक्षेत्रातील विज्ञानासोबत महात्मा गांधीजींच्या आध्यात्मिक आणि प्रयोगशील वाटचालीबाबतही विचारमंथन केलं.५६ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, मराठी विज्ञान परिषद जळगावचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचेही भाषण झाले. अशोक जैन यांच्याहस्ते आभासी पद्धतीने एम एम शर्मा पुरस्काराचे मानपत्र प्रदान करण्यात आले.
मानपत्राचे वाचन अ.पां. देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महाजन तर आभारप्रदर्शन रविंद्रसिंह पाटील यांनी केले.