Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा तालुक्यात शिवसेनेचा गड भक्कम; एकाच वेळी २०० कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला जाहीर प्रवेश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/12/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
पाचोरा तालुक्यात शिवसेनेचा गड भक्कम; एकाच वेळी २०० कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला जाहीर प्रवेश

पाचोरा(प्रतिनिधी)- पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा कायम असून भाजपाचे नुकताच पाचोरा तालुक्यातील तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड यांच्या नेतृत्वात आंबेवडगाव ,आंबेवडगाव तांडा नंबर एक व दोन, कोकडी तांडा ,जोगे तांडा येथील गोर बंजारा समाज बांधवांसह सुमारे २०० कार्यकर्त्यांचा भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपाचे कट्टर समर्थक अमोल पाटील,बबलू तडवी, नितीन निकम, नवल राठोड यांचे सह अनेक तरुणांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेत दाखल झाले.

भाजपाच्या तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड यांच्यासह सुमीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत,किसान सेनेचे अरुण पाटील,डॉ दिलीप राठोड,उत्तमशेठ राठोड,अशोक गायकवाड,भोला पाटील,संजय देवरे,विनोद पाटील, डॉ श्यामकांत पाटील लखन राठोड, श्रीराम राठोड, प्यारेलाल पवार, खुशाल राठोड, शिवदास जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेचा भगवा रुमाल घालत आ.किशोर अप्पा पाटील यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले.

भाजपा पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळू शकत नाही, याची जाणीव झाल्याने कार्यकर्त्यानी शिवसेनेची वाट धरली असून आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात गोर बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात समाजबांधव सर्वोतोपरी प्रयत्नरत राहणार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली असून आ.किशोर अप्पा पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, विजय दादा राठोड यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात नवतरुणांना मोलाचे मार्गदर्शन करून नवतरुणांच्या समस्या जाणून घेतल्या असून या सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे.

आपल्या भागातील तरुणांना युपीएससी-एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे साहित्य प्रत्येक खेड्यात तरुणांना उपलब्ध करून दिले. नवतरुण यांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी याबाबत विजयदादा राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन करत असल्याचे मत व्यक्त केले.

तसेच शिवसेना पक्षात कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखत लवकरच गोर समाज बांधवांचा भव्य मेळावा घेणार असल्याचे सूतोवाच दिल्याने गोर बंजारा समाज बांधवात आनंद व्यक्त होत आहे.दरम्यान या प्रवेश सोहळ्याने भाजपाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

शाळा, महाविद्यालये ही खरी ज्ञानमंदिरे व्हावीत- ॲड. उज्ज्वल निकम

Next Post

‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo