<
जळगाव(प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रीडा सप्ताह निमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांसाठी आयोजित दोन दिवसीय ॲथलेटिक्स खेळाची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे तांत्रिक अधिकारी श्री.राकेश सावे व प्रा.चंद्रकांत पाटील यांनी रनिंग इव्हेंट, थ्रोविंग इव्हेंट, जम्पिंग इव्हेंट,मॅरेथॉन, रोडरेस, क्रॉसकन्ट्री, रिलेरेस,ट्रॅक मार्किंग, स्पर्धेची सुरवात व शेवट, टाय कसे सोडवावे तसेच पंच कार्य कसे करावे याबाबतचे नियम याबाबीवर सविस्तर व सखोल माहिती पीपीटी द्वारे दिली.
दोन दिवसीय या कार्यशाळेचा समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री नरेंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलींद दीक्षित, अँग्लो उर्दू हायस्कुलचे अध्यक्ष श्री.एजाज मलिक, जिल्हा कलाध्यापक संघाचे सचिव श्री.अरुण सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते ऍड.ज्ञानेश्वर सुर्यवंशी, राष्ट्रीय अॅथलेटिक्स खेळाडू पोलीस उपनिरीक्षक श्री.भगवान कोळी, जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक श्री.अजय देशमुख, मंगेश भोईटे, जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा युवा शारीरिक क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील सचिव प्रा हरिश शेळके राज्य शाररिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ प्रदिप साखरे, पिंच सोडाचे संचालक श्री जफर शेख जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ पी आर चौधरी, उपाध्यक्ष प्रा ईकबाल मिर्झा व डॉ विजय पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे वरिष्ठ सहसचिव किशोर पाटील यांनी केले सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे चारशे क्रीडाशिक्षक सहभागी झाले होते याप्रसंगी डॉ कांचन विसपुते व सुदेश दराडे या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे निलेश पाटील,सचिन महाजन,गिरीश पाटील,विजय विसपुते, प्रा वसीम मिर्झा, प्रा समीर घोडेस्वार, गिरीश महाजन देवानंद पाटील,योगेश सोनवणे, सागर मणियार, जितेंद्र पाटील, जितेंद्र शिंदे,राहुल साळुंखे, देविदास महाजन,के यु पाटील, सचिन सूर्यवंशी, जितेंद्र फिरके, सुनील वाघ, संदिप पवार, पंकज वराडे, धीरज जावळे, विलास पाटील, पी डी पाटील, संजय तायडे, मनोज वाघ यांनी परिश्रम घेतले.