<
जळगांव(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान शरदचंद्रजी पवार सहस्रचंद्र दर्शन सप्ताहचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सप्ताहाची सुरुवात आज दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब ऍड. रवींद्र पाटिल यांच्या हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली.
तद्नंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असणाऱ्या चि. नैतिक टोके व ईतर लहान मुलांचा देखील वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला. सकाळी 11 ते 1 दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात स्क्रिन वर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षाचे जेष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करुन मार्गदर्शन केले.
100 गरजू व विधवा महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात साड्यांचे वाटप करण्यात आले. भजे गल्ली येथील संत गाडगेबाबा निराधार निवारा केंद्र येथील गरजु वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आले व शहरातील ईतरही निराधार गरजु व्यक्तींना 100 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. बळीराम पेठ भागांतील 500 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप वह्या व ब्लँकेट वाटप महापौर जयश्री महाजन व पक्षाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रिमांड होम येथील मुले व मुलींसाठी तुकडा एकांकिचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी मुले व मुलींची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्यात. उद्या दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सदर शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर तर्फे करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब ऍड. रवींद्र पाटिल , जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबरावजी देवकर, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, जळगाव जिल्हा निरीक्षक सौ. शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटिल, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, कल्पना पाटिल, महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटिल, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटिल, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटिल, वाल्मिक पाटिल, मजहर पठाण, सुनील माळी, अमोल कोल्हे, रमेश बाऱ्हे, कल्पिता पाटिल, योगेश देसले, माजी नगरसेवक राजू मोरे, सुशील शिंदे, विशाल देशमुख, किरण राजपूत, राजेश पाटिल, अभिषेक पाटिल, ऍड सचिन पाटिल, स्वप्नील नेमाडे, मीनाक्षी चव्हाण, सलीम ईनामदार, आरोही नेवे, डॉ. रिजवान खाटिक, रोहन सोनवणे, राहुल टोके, किरण चव्हाण, अक्षय वंजारी, अकिल पटेल, नईम खटिक, साजिद पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.