<
वसई (गुरुदत्त वाकदेकर) : वसई विरार रक्तदान महोत्सवाच्या अंतर्गत वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने द्वितीय महारक्तदान महोत्सवाचे एकाच दिवशी २१ ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजन केले होते. कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असताना सलग दुसऱ्या वर्षी अशा प्रकारच्या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मागील वर्षी १७८२ जणांनी रक्तदान केले होते यंदा हा आकडा ६५६ इतकाच झाला. विशेष म्हणजे आयोजकांनी रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तूंचं वाटप केलं नाही.
ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार आणि कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा महारक्तदान महोत्सवाचे डॉ. प्रेरणा मोरे (सिद्धकला रूग्णालय), प्रकाश ओहळे (राष्ट्रकुट संपादक), स्वप्नील वाडेकर (लेखक, पत्रकार), निलेश भानुशे, योगेश भानुशे, राहुल भांडारकर, राहुल डहाणूकर, मंजिरी नाईक आणि विजय ब्लड बॅकेचे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री दत्त मंदिर, रेमेडी येथे उद्घाटन करण्यात आले. कुमार जीत वर्तक आणि कुमारी रित वर्तक यांनी डॉक्टर आणि परिचारिका यांचा गणवेश धारण करत सर्व रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले.
महिलांचा सहभाग रक्तदान करण्यासाठी वाखाणण्याजोगा होता. नवीन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात हिरिरीने सहभाग घेतला.
द्वितीय महारक्तदान महोत्सवासाठी शिवसेना वसई शहर प्रमुख प्रथमेश राऊत, गटनेत्या आणि माजी नगरसेविका किरण चेंदवणकर, जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर, योगेश भानुशे (वसईचा राजा), जितेंद्र पोतदार (रमेदी आळी), स्वप्नील परुळेकर (रूद्र तांडव), प्रशांत कदम (भास्कर आळी), मंगेश म्हस्के (स्वराज्य यूथ फाउंडेशन) यांच्यासह रूद्र तांडव ढोल ताशा पथक, वसई फर्स्ट, राजेंद्र ढगे, रोशनी वाघ, श्री रामेश्वर मित्र मंडळ, पापडी, जयेश राऊत, हेमंत काटकर, विशाल कोळेकर, ओमकार गुरव, नागेश निळे, हार्दिक पवार, राहुल पाटील, चिन्मय महाले, हेमेंद्र आपटे, अरविंद शिवतरे, सनी पाटील, सुहास जाधव, ओमकार गणेशोत्सव मंडळ, भास्कर आळी, वसई, समाधान फाऊंडेशन, आमची वसई, न्यू कृष्णा हॉस्पिटल, आय.एम.ए. वसई, आपले मानवाधिकार फाउंडेशन, भूमिपुत्र फाउंडेशन, लायन्स क्लब, जागरूक नागरिक संस्था, युगंधरा वस्थी स्तर, विरार सामाजिक संस्था, बविआ, लायन्स क्लब ऑफ विरार, युनिटी सत्यकाम फाउंडेशन, युवा प्रतिष्ठान, दारुल उरुम गौसिया एंड चॅरिटेबल ट्रस्ट, रिद्धिविनायक रुग्णालय, डॉ. प्रशांत ठाकूर जनसेवा हॉस्पिटल, शांतेश्वर गुमते (शिवा संघटना जिल्हाध्यक्ष), देवेंद्र गुरव (शिवा संघटना जिल्हाध्यक्ष सोशल मिडिया) यांचे अनमोल सहकार्य लाभले. सर्व आयोजकांनी कोविड नियमांचं पालन करून रक्तदान शिबिर उत्साहात पार पाडल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.