<
जळगाव:ता.१५-१२-२०२१: एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने पॅन इंडिया आउटरिच प्रोग्रॅम अंतर्गत आंतर महाविद्यालयीन आभासी अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन दि. १५\१२\२०२१ रोजी केलेले होते. या स्पर्धेला प्रथम जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष, श्री. धनंजय देशपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जळगाव चे सचिव श्री. ए. ए. के. शेख होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केसीई सोसायटीचे सहसचिव अॅड. प्रमोद एन. पाटील यांनी भूषविले. तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, औरंगाबादचे सचिव श्रीमती. वैशाली फडणीस देखील याप्रसंगी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती वंदनेने झाली. महाविद्यालय दरवर्षी संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञाशाली नंदकुमार बेंडाऴे यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय अभीरुप न्यायालय स्पर्धा आयोजित करते त्याच प्रेरणेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली हे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धेची भूमिका वैशिष्ट्य स्पष्ट केले.
न्यायाधीश श्री. धनंजय देशपांडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात आपले राज्य कल्याणकारी राज्य आहे व त्यामुळेच विधीसेवा प्राधिकरणाचे काम ग्रामीण भागात चालू आहे, त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग खूप महत्वाचा होता. श्री. देशपांडे यांनी कोविड-१ चा सकारात्मक परिणाम म्हणून होतकरू वकिलांना आभासी पद्धतीने रिमोट ठिकाणांहून उच्च न्यायालयासारख्या न्यायालयात काम करण्याची नामीसंधी मिळाली. त्याचप्रमाणे त्यांनी मराठीतले कायद्याचे प्रतिशब्द जाणून घेणे, त्यांचा शोध घेणे, त्यांचा वापर मूळ संकल्पनाना धक्का न लावता केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी ब्रिटिशकालीन लो. टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्याचे उदाहरण दिले.
जळगाव विधिसेवा प्राधिकरणाचे, सचिव श्री. आरिफ शेख यांनी एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगावच्या विद्यार्थ्याचे खेडोपाडी विधी विषयक जागृती केली यासाठी कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे चे प्राचार्य डॉ. बहिराम यांनी शुभेच्छा पत्र मार्गदर्शन केले. ऑनलाइन आभासी अभिरूप न्यायालय स्पर्धेसाठीसाठी पीठासन अधिकारी महणून अॅड. महेश भोकरीकर, अॅड. आनंद मुजुमदार, अॅड. सुरज जहाँगीर, अॅड. सौरभ मुंदडा यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत एस. एम. बियाणी विधी महाविद्यालय, धुळेचा संघ विजयी झाला, तर एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगावचा संघ उपविजयी ठरला आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट विद्यार्थीनी अधियोक्ता म्हणून सरोज पाटील हिची निवड झाली, उत्कृष्ट विद्यार्थी अधियोक्ता म्हणून अनिकेत महाजन याची निवड झाली, तर उत्कृष्ट लेखी निवेदनासाठी एस एम बियाणी महाविद्यालयाच्या संघाने पारितोषिक पटकावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णल चौधरी व निरंजन ढाके यांनी केले. विजेत्यांची नावे डॉ. क्षीरसागर यांनी घोषित केले. आभार डॉ. विजेता सिंग, समन्वयक, अभिरूप न्यायालय समिती यांनी केले. यावेळी डॉ. रेखा पाहुजा, डॉ. दीपक क्षीरसागर, डॉ. योगेश महाजन, प्रा. जी. व्ही. धुमाळे व प्रा. अमिता वराडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. केसीई. सोसायटीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाऴे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.