<
फैजपुर – (प्रतिनिधी) – दि.16/12/21 गुरुवारी धनाजी नाना महाविद्यालय,फैजपुरचे प्राचार्य डॉ. पी आर. चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या विविध योजनांचा व कोर्सेची माहिती पोहचवण्यासाठी विशेषतः विद्यार्थ्यांचे उद्बोधन करण्यासाठी उद्बोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर हे एका आदर्श परंपरेचे जिवंत स्मारक आहे जे अध्ययन- अध्यापन – संशोधन यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नरत असते. कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन त्यांचे सुपुत्र स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी 1961 मध्ये परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उदात्त हेतूने महाविद्यालयाची स्थापना केली. तोच आदर्श रावेर – यावल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा शिरिषदादा चौधरी हे महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सदैव प्रयत्नरत आहेत. महाविद्यालयाची अस्मिता, प्रतिष्ठा व उज्वल परंपरेला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपलब्ध सोयी – सुविधांचा पुरेपूर वापर करावा. यासोबत महाविद्यालय परिसरात कोणतेही गैरवर्तन अजिबात सहन केले जाणार नाही असा सज्जड दम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी यांनी प्राचार्य उदबोधन सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात शिस्त समिती, लैंगिक छळ प्रतिबंधक समिती, अँटी रॅगिंग समिती, विद्यार्थी विकास विभाग , राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचार्य उद्बोधन सत्रात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी , उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा वंदना बोरोले, विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ जी जी कोल्हे, एनसीसी अधिकारी लेफ़्ट डॉ राजेंद्र राजपूत, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य चौधरी यांनी दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीसाठी प्राध्यापक दार महिन्याला आपल्या पगारातून काही रक्कम दान करत असतात त्यांच्या उदात्त हेतूने चालवलेल्या या उपक्रमाचा जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यवा असे आव्हाहन करत महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा उपस्थितांसमोर विशद केली व सोबतच महाविद्यालयाला स्वच्छ, सुंदर व गुणवत्तापूर्ण बनवण्यात विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहनही केले. महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेले कै.दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी, करियर कट्टा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडा विभाग , सांस्कृतिक विभाग, एन एस एस, एनसीसी यांचा सकारात्मक उपयोग करून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हावे, व परिसराचे,महाविद्याल सोबतच आपल्या परिवाराला अभिमान वाटेल असे नावलौकिक मिळवावे अश्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार शिस्त समितीचे चेअरमन डॉ मनोहर सुरवाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा व्यवस्थापन पदाधिकारी, प्रशासन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी श्री शेखर महाजन, सिद्धार्थ तायडे, नितीन सपकाळे यांनी परिश्रम घेतले.