<
भडगाव(प्रतिनिधी)- १६ रोजी भडगांव येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ईश्वर जे.ठाकरे साहेब यांनी त्याचे कोर्टात जर्सी गाय चोरीच्या एका खटल्यात रे.फौ.ख.नं.१४/२०२१ मध्ये भारतीय दंड संहिता कलम-३७९ आरोपी-मनोज एकनाथ पवार यांचे विरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने,सदर खटल्यात त्यास पंधरा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सदरचा खटला पहिल्यापासुन ते शेवटपर्यत सरकारी वकील व्हि.डी.मोतीवाले यांनी स्वत:- चालवुन, त्यांनी सरकारपक्षातर्फे कोर्टात भक्कम व जोरदार बाजु मांडली.
सदर खटल्यात सरकारी वकीलांनी आठ साक्षीदारांची साक्ष घेतली. सदर खटल्याची हकिगत ,फिर्यादी निंबा नंदा पाटील रा.बोदर्डे ता.भडगांव यांनी आरोपीविरुध्द दि.२५/११/२०२० रोजी मौजे कनाशी शिवारात लोणपिराचे कच्च्या रस्त्यालगत असलेल्या फिर्यादीचे पञी शेडमधून चाळीस हजार रुपये किंमतीची एक पांढरी रंगाची व काळे ठिबके असलेली एच.एफ.जर्सी जातीची गाय फिर्यादीचे संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने चोरी करुन घेवुन जात असतांना आरोपी मिळुन आल्याची फिर्याद केली होती.
सदर खटल्याचा तपास पो.हे.काॅ.जिजाबराव पिंताबर पवार, राईटर पो.कॉ. प्रकाश गवळी यांनी केलेला होता. सदर खटल्यात आरोपी एका वर्षापासुन नाशिक जेल मध्ये आहे.सदरचा खटला हा अंडरट्रायल चालला. पोलीस निरीक्षक अशोक उतेकर व सहा.फौजदार रमण कंडारे यांनी सहाय्य केले.