जळगांव(प्रतिनिधी)- राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत प्राप्त पत्रानुसार ५०, ७५ व १०० वेळा स्वेच्छा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची माहिती मागविण्यात येत आहे. या संदर्भात खाली दिलेल्या फॉर्ममध्ये दिलेल्या तपशीलानुसार आपण संपूर्ण माहिती भरून पाठविणे आवश्यक आहे.

पात्र रक्तदात्यांनी खालील पत्यावर माहिती भरून पाठवावी व त्याची एक प्रत माहितीस्तव रेडक्रॉस रक्तकेंद्र, रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटल रोड, जळगाव येथे पाठवावी. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 0257-2226233 पत्ता- सहाय्यक संचालक राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य, रवींद्र अनेक्स, ५ वा मजला, दिनशौ वाच्छा रोड, चर्चगेट, रिक्लेमेशन, मुंबई – 400020 फोन- 022-22830216. Email- sbtc@mahasbtc.com यावर संपर्क साधावा.