<
म्हसावद- (प्रतिनिधी) – तालुक्यातील डोमगांव येथील अभ्यासिकेत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दि.२०.१२.२०२१ रोजी स्पर्धा परिक्षांसाठी लागणारे पुस्तकांची भेट देण्यात आली. प्रसिध्द लेखकांची पुस्तक यात सामिल असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी याचा लाभ होणार आहे. यावेळी भारत मातेच्या सेवेत असणारे जवान सुर्यकांत सुरवाडे, नारायण मंडपे , चैत्राम वखरे, दिपक सुरवाडे, संतोष बोरसे, गणेश सोनवणे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच हिलाल सुरवाडे, उपसरपंच विश्वनाथ मंडपे, सुर्यकांत सुरवाडे, भूषण धनगर, पोलिस पाटील अरुण जाधव, राजु ओंकार वाघ, युवराज महाले, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठाकुर सर, प्रा.राजेश जाधव सर पत्रकार सुकलाल सुरवाडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, येथील अभ्यासिकेत गरजवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांशिवाय इतर परिक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी मदत म्हणून माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी गावातील सैन्य दलात असलेल्या जवानांचा देखील सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठाकुर सर, प्रा.राजेश जाधव यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश लक्ष्मण पवार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुनिल पाटील, कपिल पाटील, राहुल वाघ,नितीन महाले, अतुल पाटील, प्रविण महाले, गौरव सुरवाडे, विशाल धनगर, जयेश बोरसे, आकाश कंखरे यांच्यासह अभ्यासिकेत येणार्या विद्यार्थ्यांनी केले.