<
मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा शासनाने 3 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला आहे. या मसुद्याबाबत हरकती व सूचना 45 दिवसांच्या आत सादर कराव्यात, असे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक संबंध संहिता, 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, 2021 चा मसुदा नियम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in तसेच कामगार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर कायदा व नियम शीर्षाखाली प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या [email protected] वर स्विकारण्यात येतील.
या अधिसूचनेवर नमूद केलेला कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी या प्रारूपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेकडून प्राप्त होणारे आक्षेप किंवा सूचना, राज्य शासनामार्फत विचारात घेण्यात येतील, असे कामगार आयुक्त यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.