<
जळगांव(जीमाका)- आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना एका छत्राखाली राबविण्यासाठी अटल वयो अभ्युदय (AVYAY) योजना कार्यान्वित केली आहे.
त्यानुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC) व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य कृती आराखडा (SAPSrC) या योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC) व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य कृती आराखडा (SAPSrC) या योजनांचे (https://grants-msje.gov.in) या संकेतस्थळावर Schemes या टॅबवर जावून प्रस्ताव सादर करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. त्यानुसार इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी विहीत केलेल्या अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करून परिपूर्ण प्रस्ताव संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले.