<
भारतीय तरुणांमध्ये जग जिंकण्याची उर्मी, ऊर्जा आणि सामर्थ्य असून विविध विषयांचे ज्ञान व अंगी असलेल्या कौशल्यांचा आत्मविश्वास यांच्या बळावर आयुष्यात कोणतेही ध्येय प्राप्त करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन लेफ़्ट कर्नल पवन कुमार यांनी केले.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव अंतर्गत मुक्ताईनगर व फैजपूर या दोन महाविद्यालयांसाठी आयोजित सात दिवशीय वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, सुभेदार जय बहादुर, हवालदार जावेद, हवालदार शैलेंद्र कुमार महाविद्यालया चे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत व सहभागी कॅडेटस उपस्थित होते.
यावेळी बोलताना लेफ़्ट कर्नल पवन कुमार म्हणाले, एनसीसी जगातील सर्वात मोठी युनिफॉर्म यूथ ऑर्गनायझेशन असून तरुणांमध्ये एकता, शिस्त व सैन्य भरतीच्या तयारीसाठी आवश्यक सर्वांगीण विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय तरुणांमध्ये जग जिंकण्याची ताकत असून फक्त इंग्रजी भाषा समृद्धीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास व कोणत्याही गोष्टीसाठी आत्मविश्वास वृद्धिंगत केल्यास काहीही शक्य असून वार्षिक प्रशिक्षण शिबिरात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा फक्त एन सी सी परीक्षेपुरता मर्यादित उपयोग न करता जीवनाच्या प्रत्येक अंगात अवलंबित्व करावे असे आवाहन केले.
या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात मुक्ताईनगर येथील 25 व फैजपूर येथील 45 कैडेट्स सहभागी असून पुढील सात दिवसात बॅटल फिल्ड, बैटल क्राफ्ट, वेपन ट्रेनिंग, जजिंग डिस्टन्स,, मॅप रिडिंग या मिलिटरी सब्जेक्टस सोबतच व्यक्तिमत्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, लीडरशिप मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरिषदादा चौधरी, आमदार- रावेर यावल विधानसभा मतदारसंघ, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सोबत नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, नारायण जोगी, सिद्धार्थ तायडे, राजेन्द्र ठाकुर, आदी परिश्रम घेत आहेत.