<
भातखंडे/भडगाव(प्रतिनिधी)- एखादी समस्या सुटत नसली तर गावकरी एकत्र येतात लोकवर्गणी आणि श्रमदानातुन ती समस्या दुर करतात. एखादा माणुस गावासाठी स्वखर्चाने छोटा पुल उभारतो अशी अगळी-वेगळी कामगीर भातखंडे बु. ता. भडगाव येथील माधराव महाजन यांनी केली.
कोवीड19 मध्ये त्यांची तबेत अंत्यत हालखीची झाली होती. दुरूस्त झालेले माधराव महाजन यांनी केली आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टीची बचत होण्यास मदत झाली आहे. भातखंडे बु ते पाचोरा २२किमीचे अतंर आहे व आता गिरणा नदीवरील पुलामुळे केवळ ७ कीमी इतके अतंर झाले. परधाडे रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी प्रवाश्यांची सोय झाली आहे. माधराव महाजन यांनी स्व:ता जळपास यावर्षी दिड लाख रुपये खर्चुन पुल बांधुन दिला आहे. या पुलामुळे आता पाचोरा जाण्यासाठी गावकर्यांना वेळपैसा वाचणार आहे.
या वर्षी गिरणेचे आवर्तन देण्यात येणार असल्यामुळे नदी पार करण्यासाठी हिवाळ्यात मोठी कसरत करावी लागत होती. या हंगामी पुलासाठी भातखंडे सह परिसरातील नागरिकांची समस्या सुटली आहे. या पुलाचे वैशिष्टय म्हणजे नदीला पुल १२५ते १५० फुट लांबीचा असुन लोखंडी अँगल वापरले आहेत अँगल मध्ये लोखंडी प्लेट वापरण्यात आल्या असुन ३५० फुट तार जाळी चार फुल उंच दोन्ही बाजुने अँगल वापरुन जाळी फिट करण्यात आली असुन ७०० ते ७५० रेतीच्या गोण्या भरूण बाजुला भराव केला आहे. मध्यभागी लाकडी फाळ्या ऐवजी लोखंडी प्लेटचा वापर करण्यात आला आहे. १५०फुट लांब आणि चार ते साडेचार फुट रुंदीचा पुल आहे.
दोन्ही बाजुला सरंक्षण म्हणूण चार फुट उंचीची तारजाळी उभे अँगल वापरून पुर्ण पुलाला जाड जाळीचा वापर करण्यात आला आहे. दरवर्षी थोडीफार दुरूस्ती करावी लागते. हा खर्च आणी गुंतवणुक वसुल करण्यासाठी मोटार सायकलस्वार कडुन 5 ते 10 रूपये किंवा स्वेच्छेने जे देतील तेवढे पैसे घेतले जातात. पादचारी व सायकल स्वार यांच्या साठी मोफत सेवा आहे.