<
नाशिक (चांदोरी)— शेती मध्ये रसायनांचा वापर केल्याने शेतीतील ऑरगॅनिक कार्बन ची लेव्हल कमी होते, परिणामी अन्नधान्यातील गुणवत्ता कमी होते आणि असाच रासायनिक खतांचा वापर चालू राहिला तर काही दिवसात येणाऱ्या पिढीकडे अपल्याला मृत शेती सोपवावी लागेल, अर्थात शेती नापीक होईल. भविष्यातील असा इशारा कृषी तज्ञ अधिकारी धनंजय वांर्डेकर यांनी दिला.,
ब्रम्हाकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रिय संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदिजी यांच्या शुभहस्ते चंदोरी मिरा लोंस येथे २३ डिसेंबर राष्ट्रीय किसान दिनी शेतकऱ्यांचा समानार्थ सन्मान अन्नदात्या चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, याप्रसंगी वांर्डेकर बोलत होते. रासायनिक खतांच्या वापराने अनेक भयंकर कॅन्सरसारखे व्याधी उत्पन्न होतात त्याच बरोबर परदेशात शेतीमाल हा उच्च प्रमाणात रसायन सापडल्याने स्वीकारला जात नाही यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते असेही वार्डेकर म्हणाले.
योगिक शेतीचे अभ्यासक वंदना जाधव यांनी विषमुक्त शेती बरोबर योगिक शेती केल्याने शेतमाल सकस बनतो व भरघोस उत्पन्न येते असे प्रतिपादन केले.
डॉक्टर राजेश जावळे यांनी सांगितले की, आपल्या जीवनात केलेले कर्म व त्यातून उत्पन्न होणारे फळ हे व्यक्तीला नक्कीच फलदायी ठरते.
ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या हस्ते उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांना सत्कारीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले, प्रयोगशील शेतकरी दशरथ टर्ले व विठ्ठल सावकार बा
यांनी योगिक शेतीचे अनुभव स्पष्ट केले. कार्यक्रम पंचक्रोशीतील शेतकरी उत्साहाने उपस्थित होता.