<
जळगाव, दि. 25 ( प्रतिनिधी ) – येथील देवांग कोष्टी समाजाच्या 2022 वर्षाच्या दिनदर्शिकेचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले. पश्चात उपस्थितांना दिनदर्शिकेचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी देवांग कोष्टी समाजाचे शहर अध्यक्ष चंद्रकांत पंधारे तसेच सुनील भागवत , कैलास पंधारे , विठ्ठल कोष्टी , अविनाश मुरसाळे , राजेंद्र हरीमकर , नंदलाल तिडके , राजन तडवी आणी विजय खराडे आदि समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता देवांग कोष्टी समाज संघटनेच्या पदाधिकारि व इतर बांधवांनी परिश्रम घेतले .