<
जळगांव : विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गणपतीचे थाटा माटात जल्लोषात आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण दीड दिवसाचा गणपती संस्थेत बसविला गेला. गणेशोत्सवाचे औचीत्त्य साधून आज शिक्षक मनोज भालेराव यांनी इयत्ता सातवीच्या वर्गात ‘गणेशोत्सव चित्रकला स्पर्धा’ घेतली. या स्पर्धेत विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी पण सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांना या गोष्टीचे खूप नवल वाटले व आनंद झाला. यात सामाजिक जनजागृती म्हणून ‘पर्यावरण संवर्धन, बेटी बचाव बेटी पढाओ, प्रदूषण एक समस्या, लोकसंख्या अभिशाप’ इ ज्वलन्त विषयावर चित्रस्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कारांची रुजवणूक व्हावी म्हणून ‘गणेशोस्तव’ या उत्सवाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना सामाजिक जनजागृती कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. चित्र काढून झाल्यानंतर शिक्षक मनोज भालेराव यांनी त्या चित्रांविषयी मार्गदर्शन केले व माहिती सांगितली. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे सचिव सचिन दुनाखे यांनी केले. या प्रसंगी मुख्यध्यापक शोभा फेगडे, शिक्षक पंकज नन्नवरे, रमेश ससाणे, शिक्षकेतर कर्मचारी किशोर तिवारी उपस्थित होते.