<
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धा परीक्षांचे दैनंदिन काळातील वाढते महत्त्व लक्षात आणून दिले. तसेच करिअर कट्टा या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मोठी संधी आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा करियर कट्टाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रम कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. एस. डी. भैसे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. एल.जी.कांबळे व सर्व प्राध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमाचे समन्वयक डॉ. बी. एस. भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डाॅ. जी. डी. चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डी. ए. मस्की यांनी मानले.