<
जळगाव – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील तहसील कार्यालयात अभिवादन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्याचे प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीचे औचित्य साधत जळगाव शहरातील शिवाजी नगर येथील हरिजन कन्या छात्रावास येथील मुलींना जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.. कार्यक्रमाचे पाहुणे अध्यक्ष म्हणून विद्यार्थीनी मधून खुशी वाघमारे ही होती.
तसेच या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष आपल्या संभाषणातून व्यक्त केले.. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील एक सुंदर गीतगायन केले… कार्यक्रमासाठी छात्रावासच्या अधीक्षिका प्रतिभा कोळी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या… कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील यांनी केले होते…