<
जळगाव, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार ८ जानेवारी २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार 8 जानेवारी 2022 रोजी सकाळी १०.३० वाजता पाळधी येथे राखीव, सकाळी ११.३० वाजता जळगावकडे प्रयाण व पिंप्राळा भागात विविध विकास कामांचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी १२.३० वाजता जैन मंदिर येथे भेट त्यानंतर सोयीनुसार पाळधीकडे प्रयाण व राखीव, दुपारी ५ वाजता अरुश्री हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लॅंटचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती त्यानंतर सोईनुसार पाळधी कडे प्रयण व राखीव.