<
आज दिनांक 07/01/2022 शुक्रवार रोजी सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथे इयत्ता 9वी ते 12वी च्या 15 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या लसीकरणाच्या शिबिरास शालेय समिती चेअरमन आबासाहेब दत्तात्रय पवार, उच्च माध्यमिक विभागाचे चेअरमन बाबासाहेब विनय जकातदार, किमान कौशल्य विभागाचे चेअरमन नानासाहेब विजय देशपांडे, पीटीसी चे ज्येष्ठ संचालक श्री. ग. ल. पूर्णपात्री सर, आरोग्य सहाय्यक बी. एम. धनगर, आरोग्य सेवक रमेश वाढे, आरोग्य सेविका श्रीमती कोष्टी व आशा स्वयंसेविका उपस्थित होते. या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने प्राचार्य/ विश्वासराव साळुंखे, उपमुख्याध्यापक किशोर पाटील, पर्यवेक्षक अरुण पाटील, ज्येष्ठ शिक्षिका कोसोदे मॅडम, एल के वाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमात उपमुख्याध्यापक के एस पाटील यांनी व आरोग्य सहाय्यक यांनी लसीकरणाचे फायदे व लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी. तसेच प्रत्येकाने समाजात वावरताना करावयाची समाज जागृती व घ्यावयाची काळजी. यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विभागाचे श्री शरद पाटील यांनी केले. या कार्यक्रमानंतर पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.