Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

2.30 लाखांपर्यंत मोफत सुविधा;कसे ते जाणून घ्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
2.30 लाखांपर्यंत मोफत सुविधा;कसे ते जाणून घ्या

जनधन खातेधारकांसाठी खुशखबर

नवी दिल्ली -(न्यूज नेटवर्क)-मोदी सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या काही वर्षांत तिप्पट झाली आहे. मार्च 2015 मध्ये खात्यांची संख्या 14.72 कोटींवरून 43 कोटींवर गेली आहे. मोदी सरकारची ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरली आहे.

आज आपण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा जाणून घेऊयात.

प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे गरीब लोकांसाठी बँकांचे दरवाजे उघडले गेले आहेत आणि त्यांना जन धन खाते पासबुक आणि रुपे कार्डची नवीन सुविधा दिली आहे. या योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर, प्रत्येकाला स्वस्त विमा, पेन्शन आणि इतर आर्थिक उत्पादनांची सुविधा देखील दिली जाते.

2.30 लाखांचा लाभ मिळेल

जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. खातेदारांना 1,00,000 रुपयांचा अपघाती विमा आणि 30,000 रुपयांचा सामान्य विमा दिला जातो. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. अशा प्रकारे जन धन खातेधारक 2.30 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकतात.

खाते कसे उघडायचे ?

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. मात्र, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. तुमचे दुसरे सेविंग खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यातही वळवू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून जास्त आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ?

जन धन खाते उघडण्यासाठी KYC अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी केली जाते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या कागदपत्रांचा वापर करून जन धन खाते उघडता येते.

‘या’ बँकांमध्ये उघडता येतात खाती

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाती उघडली जातात. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जन धन खाते उघडू शकता. मात्र, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता.

कोणत्या खाजगी बँकांमध्ये जन धन खाते उघडू शकता

धनलक्ष्मी बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, फेडरल बँक, आयएनजी वैश्य, कोटक महिंद्रा, कर्नाटक बँक, इंडसइंड बँक हे देखील जन धन खाते उघडण्याची सुविधा देतात.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द

Next Post

मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून घेतला आढावा

Next Post
मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून घेतला आढावा

मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून घेतला आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d