<
-जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या शुभहस्तेआरेतील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामास सुरूवात
– एकुण ४ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ९७ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुर
– आरेतील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीबरोबरच रस्ते मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत वायकर यांनी बैठका घेतल्या व पत्रव्यवहारही केला.
– पहिल्या टप्प्यात युनिट क्रमांक ५ (मार्केट) मयुर नगर बस स्टॉप पर्यंत, युनिट क्र.६ आरे हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता, पिकनिक पॉईंट ते युनिट क्र.२५ पर्यंतचा रस्ता, पोलिस स्टेशन ते छोटा काश्मिर या रस्त्यांचा यात समावेश
मुंबई : स्थानिक जनतेच्या मागणीनुसार आरेतील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास आजपासून सुरूवात करण्यात आली. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते आरेतील एकुण ४ अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ पार पडला. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी ९७ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुर करण्यात आले आहे. लवकरच मुंबई महानगरपालिकेतर्ङ्गे रुपये ४७ कोटी खर्चुन आरेतील सुमारे ७ किलोमीटरच्या मुख्य रस्त्याच्या कामाचेही भुमिपूजन पर्यावरण, पर्यटन व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहितीही, वायकर यांनी यावेळी दिली.
आरेतील ४५ किलो मीटरच्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेत वाढ होत असल्याने हे रस्ते मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावे अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करुन येथील जनतेला दिलासा देण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी बैठका व पत्रव्यवहारही केला होता. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात ३ कोटी २५ लाख रुपये मंजुर करुन हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. त्यानुसार आरेतील कार्यकारी अभियंता रामटेक यांनी आरेतील अंतर्गत १० रस्ते प्रस्तावित केले होते.
आरे दुग्ध वसाहतीतील प्राप्त निधीचे विनियोजन व खर्च करण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीची १० डिसेंबर २०२१ रोजी पार पडलेल्या बैठकीत १० पैकी पहिल्या टप्प्यात ४ रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यात युनिट क्र. ५ (मार्केट) मयुर नगर बस स्टॉप पर्यंतचा रस्ता (१५०० मीटर), युनिट क्र. ६ आरे हॉस्पिटल पर्यंत रस्ता (६०० मीटर), पिकनिक र्पॉर्फंट ते युनिट क्र. २५ पर्यंतचा रस्ता (२५० मीटर) व पोलीस स्टेशन ते छोटा काश्मिर (२५० मीटर) या रस्ते दुरुस्तीच्या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून यासाठी तब्बल १ कोटी ९७ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वायकर यांनी दिली. या रस्त्यांच्या कामांचा सुभारंभ वायकर यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. यावेळी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, नगसेविका रेखा रामवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कदम, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदिप गाढवे, अर्पणा परळकर, हर्षदा गावडे, मयुरी रेवाळे, सुरेखा गुटे, पुजा शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.