<
जळगाव -(प्रतिनिधी )- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधित रुग्णांची संख्या १७९ वर आढळून आली आहे. तर आज देखील एकही रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचे आज प्राप्त अहवालातून दिसून आला. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भुसावळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.
गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या ५ ते १० च्या आत आढळून येत होती. मात्र ओमिक्रोनमुळे राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज रविवारी दिवसभरात कोरोनाचे १७९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १६ रुग्ण बरे झालेले आहेत, तसेच आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
तालुका निहाय आकडेवारी
आजच्या बाधितांमध्ये जळगाव शहरात ६४ , जळगाव ग्रामीण ५ , भुसावळ तालुका ७३ , बोदवड ०५ ,अमळनेर ०१ , चोपडा १ , भडगाव ० ,पाचोरा २ , धरणगाव १, जामनेर ५ , पारोळा ० , चाळीसगाव १६ , मुक्ताईनगर २ ,रावेर ०२ , व इतर तालुक्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळले आहे.