<
जळगाव, दि.४ – शासनाच्या नवीन सूचनेनुसार सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक आहे. शासनाच्या सुचनेची जनजागृती करणाऱ्या पोस्टरचे मंगळवारी अनावरण करण्यात आले.
भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानके प्राधिकरण दिल्ली यांच्या परीपत्रकाप्रमाणे दिनांक १ जानेवारी २०२२ पासून सर्व व्यापाऱ्यांना बिलावर एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक आहे. तसेच सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक आहे.
शासनाच्या परीपत्रकाप्रमाणे जनजागृती होण्यासाठी अन्न व औषध प्रशासन जळगाव येथे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या हस्ते पोस्टरचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, होलसेल व्यापारी सुदर्शन बरडीया, मनोज झाबक, चंद्रशेखर राका, रामभाऊ पाटील, विनय तोलानी, किशोर गोर हे उपस्थित होते.
प्रसिद्ध करण्यात आलेले पोस्टर सर्व आस्थापनावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.