<
जळगाव(प्रतिनिधी )- जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून नव्या कोरोना बाधितांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज जिल्ह्यात ८० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. दिलासादायक बाब अशी की, आज देखील एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये दिली आहे. आज सर्वाधिक रुग्ण चोपडा व भुसावळमध्ये आढळून आले आहेत.
कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. काल रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे १७९ रुग्ण आढळून आले आहे. तर आज ८० रुग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३८६ बाधित रूग्ण (Corona Positive) आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ५५२ रुग्ण उपचार घेत आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजच्या बाधितांमध्ये जळगाव शहरात १३, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ २५, अमळनेर २, चोपडा २५, यावल १, जामनेर १, रावेर ४, मुक्ताईनगर ४ तर इतर जिल्ह्यात एक असे एकूण ८० नवे बाधित आज आढळून आले.