<
रावेर-(दिपक तायडे )-तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेले ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून उप जिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी होत असून रावेर शहर युवा सेना अध्यक्ष राकेश घोरपडे यांच्यासह पदाधिकारी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.रावेर तालुका हा कृषि प्रधान असून तापी नदीवरील हतनूर धरणासह इतर पाच धरणांचा जलाशय असून सातपुडा पर्वताच्या कुशीत 22 आदिवासी गावे आहेत.
अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्ग असल्याने अपघात, विष बाधा, वन्यजीव यांचे हल्ले आदी अनेक प्रकारचे रुग्ण याठिकाणी भरती होत असतात. अत्याधुनिक उपचारासाठी रुग्णांना जळगाव जावे लागते वाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात . तालुक्यातील जनतेवर योग्य उपचार वेळीच मिळावेत आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा यासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हारुग्णालयात रूपांतर व्हावे आधी पालक मंत्री यांच्याकडे करण्यात आली असून शासन दरबारी ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना.पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले यावेळी सेना शहराध्यक्ष बंटी महाजन, युवा सेनाध्यक्ष राकेश घोरपडे यांच्या सह युवा सेना तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित, गणेश महाजन, उमेश वरणकर , राहुल कोळी, राम शिंदे, चेतन कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.