<
जळगाव – राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या भारतातील सर्वात प्रथम 12 वर्षा आतिल लहान मुलांच्या ग्रासरूट हॉकी स्पर्धेत जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डंका वाजविला. यात शाळेतील कार्तिक विनोद विसपुते, जयेश रवि संगेले यांची महाराष्ट्र संघात निवड झाली असून संघाचे प्रतिनिधित्व करत उपविजेतेपदक प्राप्त करून शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
भीलवाडा येथे आयोजीत स्पर्धेप्रसंगी भारतातून पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कश्मीर तेलंगाना कोलकाता राजस्थान महाराष्ट्र हैदराबाद बिहार या 16 राज्यातुन संघ आले होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले. सहारनपुर उत्तर प्रदेश विजय झाले तर महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले.केले.हॉकी खेळाडूंना प्रा.आसिफ खान व सत्यनारायण पवार यांचे मार्गदर्शन लाभले. अशोक कुमारांच्या हस्ते बक्षीस बक्षीस वितरण साठी भारताचे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव ओलंपियन श्री अशोक कुमार ध्यानचंद यांच्या हस्ते लहान मुलांना ट्रॉफी व मेडल देऊन सत्कार करण्यात आले. गोदावरी परिवारातर्फे अभिनंदन गोदावरी शाळेच्या खेळाडूंच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, गोदावरी शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी खेळाडूंचे अभिनंदन.