<
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज जिल्ह्यात तब्बल २२१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. आज भुसावळ येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज पुन्हा एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज २११ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ४३ हजार ६०७ इतक्यावर गेली आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५७९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
आजच्या बाधितांमध्ये जळगाव शहरात ४३, जळगाव ग्रामीण ०४, भुसावळ १०७, चोपडा ३२, पाचोरा ५, एरंडोल ५, पारोळा २, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर १, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण २११ बाधित रूग्ण आढळले आहे.