जळगांव(प्रतिनिधी)- विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालवलेल्या प्रगती माध्यमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून ऑनलाइन अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ या महान कर्तुत्ववान स्त्रीयांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वामी विवेकानंद या महान विभूती चा आदर्श घेऊन विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ तयार करून शाळेच्या ग्रुप वर पाठवले.
विद्यार्थी व विद्यार्थिनी ऑनलाइन सादर केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगती माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, प्रगती बालवाडीच्या मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, प्रगती विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे, अनिल वाघ व्यासपीठावर विराजमान होते. ऑनलाइन सादर केलेल्या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त प्रेमचंद ओसवाल, संस्थेचे सचिव सचिन दुनाखे, संस्थेचे अध्यक्ष मंगला दूनाखे ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून शाबासकी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना, स्वाभिमान, आत्मसन्मान, शौर्य, अंगीकृत करण्यास मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिजाऊ आणि सावित्री या महान स्रीयांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घ्यावा याबाबत जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हा उपक्रम साजरा केल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पाटील यांनी तर आभार अनील वाघ यांनी मानले. हर्षदा पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक भाग्यश्री तळेले, दीपक बारी, सुभाष शिरसाट, प्रियंका वाणी यांनी सहकार्य केले. शिक्षकेतर कर्मचारी किशोर तिवारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.