भडगाव(प्रतिनिधी)- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलीत वडजी येथिल टि .आर . पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्र माता जिजाऊ व विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या अभियानांतर्गत सर्वप्रथम विद्यालयात ज्ञानाची देवता सरस्वती, संस्थेचे आराध्यदैवत कर्मवीर तात्यासाहेब, राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे विद्यालयाचे प्राचार्य ए .एस. पाटील यांच्या व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ जयंतीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विदयालयामार्फत राष्ट्र माता जिजाऊ आणि विवेकानंद यांचे विचार या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली . त्याचप्रमाणे ऑनलाईन भाषणे देखिल मुलांनी केली . जिजाऊं विषयी आणि विवेकानंद यांच्या विषयी माहिती , त्यांचा पूर्ण जिवनपट मुलांनी सांगितला. यावेळी प्राचार्य ए .एस .पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.