<
“स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा विचार जिजाऊंनी शिवाजी राजांना दिला. कर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व आणि दुर्दम्य आशावाद बहाल केला. स्वतःचा संसार फुलवण्यापेक्षा अठरा पगड जातीच्या गोरगरीब रयतेचे राज्य उभे करणे हेच कर्तृत्व मानून स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारी माणसे निर्माण केली. प्रसंगी स्वतःला चिखलात घालून रणांगणावर जाणाऱ्या जिजाऊ राजमाता होत्या, असे प्रतिपादन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल.जी. कांबळे यांनी केले.
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन प्रा. एल. जी.कांबळे यांच्या हस्ते पार पडले तर स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण प्रयोगशाळा परिचर दिलीप तडवी यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस.आर. पाटील होते. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक मराठे, नॅक समन्वयक प्रा. ए.एन. भंगाळे, डॉ. जस.जी.शेलार, डॉ. बी.एस.भालेराव, प्रा. एस ए.कोळी, डॉ. अतुल देशमुख, संदीप केदार, प्रवीण तडवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक मराठे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय भैसे केले तर आभार प्रा. रचना गजभिये यांनी मानले.