<
जळगाव(प्रतिनिधी)- हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट आणि सेवक सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे, संचालक राकेश कंडारे, सेवक सेवाभावी संस्थेचे संस्थापक विशाल शर्मा, नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, किशोर पाटील, चंदन पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना किशोर पाटील म्हणाले, कि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिजाऊ यांचे प्रेरणादायी कार्य आहे. त्यांच्या या कार्यामुळे आपण आज स्वातंत्र्य भारतात जगत आहोत.
तसेच सेवक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, आज चा दिवस सन 1984 पासून राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येतो.
हिंदू धर्माचा प्रचार व शिकागो येथे सन 1893 मधे झालेल्या विश्व धर्म संमेलनात स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण प्रेरणादायी आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी हिंदूत्व स्वाभिमान चे सचिव मयुर बारी, किशोर पाटील, चंदन पाटील, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या भारती काळे, राकेश कंडारे, रिद्धी जानवी फाउंडेशनच्या चित्रलेखा मालपाणी उपस्थित होते.