<
जळगाव-(प्रतिनिधी) – शा.वै.म.व रू, जळगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत व दिव्यांग बोर्डाच्या कामासाठी कंत्राटी क्लिनिकल सायकोलॉजीस्ट हे पद भरण्यात आले. यामुळे मानसिक रूग्णांची व्हि एस एम एस व आय क्यू टेस्ट करण्यासाठी रूग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन ह्या टेस्ट कराव्या लागायच्या यात रूग्णांचा खूप वेळ जाऊन रूग्णांची पुन्हा ये -जा व्हायची हे काम २-३ दिवसांवर लोटलं जाऊन हजार दोन हजार रूपयांची आर्थीक हाणी ही होत होती.
रुग्णांची होणारी लूट, वेळेचा अपव्यय आणि गोरगरीब रूग्णांच्या नाहक त्रासाला लक्षात घेता. जिएमसी ने क्लिनीकल सायकोलॉजिस्ट म्हणून विजयेंद्र पालवे यांची मानसोपचार विभाग ओपीडी ११० ला निवड केली. ह्या टेस्ट जिएमसीत निःशुल्क सेवा केल्या जातात. तसेच अवघ्या ४०/४५ मिनिटाच्या कालावधीत करून रिपोर्ट दिल्या जातो. त्यामुळे रूग्णांची होणारी लूट व होणारी धावपड थांबली जाणार व रूग्णांना दिलासा मिळणार आहे.