<
जळगाव- जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पितांबर पाटील यांनी केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत असलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई मार्फत महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, जैन, सिख, ख्रिश्चन, पारसी, ज्यू या समुदायातील गरजू विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक, तांत्रिक या सारख्या उच्च अभ्यासक्रमाकरीता (MBA,MBBS,BAMS,BE, IT) शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज सन 2021 -2022 या वर्षासाठी स्विकारली जात आहे. तसेच अर्ज ऑनलाईन भरण्यात येत आहे. या योजनेचे जास्तीत जास्त अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. जिल्हा कार्यालयात संपूर्ण कागदपत्रांसह हे अर्ज जमा करण्यात यावी. अधिक माहिती करीता संबधित जिल्हा कार्यलय व महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करा. तसेच ऑनलाईन अर्ज https://malms.maharashtra.gov.in या लिंकवर करु शकता.
जळगाव जिल्हा कार्यालयाचा पत्ता- मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जळगाव गणपती नगर, अटल हॉस्पिटल जवळ, बाफना स्वाध्याय केंद्राच्या गल्लीमध्ये, पुष्पांजली सोसायटी, मातोश्री इमारत प्लॉट नंबर 5 जळगाव
अधीक माहितीसाठी संपर्क- 07588007560, 09049033424
फॉर्म भरताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत सदरची कागदपत्रे फाईल सोबत जोडून जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे जमा करावे
1)अर्जदाराचे आधार कार्ड, रहिवासी दाखला. डोमेसाइल सर्टिफिकेट, कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, एलसी ची झेरॉक्स , मागील दहावी /बारावी हे शिक्षण झाले आहे असेल त्यांच्या मार्कशीट किंवा इतर कोणतेही शिक्षण असेल त्यांचे मार्कशीट, कॉलेजचे आयडी कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, कॉलेजचे बोनाफाईड , वर्षनिहाय फी चा तक्ता, एसबीसी/ ओबीसी/ मायनॉरिटी मिडत असेल त्याबाबत महामंडळाचा विहित नमुना महाविद्यालयाकडून भरून आणावा
2)वडिलांचे कागदपत्रे वडीलांचे आधार कार्ड, मतदान कार्ड ,पॅन कार्ड, रहिवासी दाखला , राशन कार्डाची कलर प्रत, ओरिजनल उत्पन्नाचा दाखला,
3) जमीनदारांचे कागदपत्रे 1) नोकरदार असल्यास आधार कार्ड, मतदान कार्ड लाईट बिल ची झेरॉक्स, पॅन कार्ड, ज्या विभागास नोकरी आहेत या विभागाचे आयडी कार्ड, मागील तीन महिन्याचा पगाराचा संबंधित विभागाचा दाखला, महामंडळाचे दोन विहीत नमुने,
2) जामीनदार मालमत्ता धारण असेल तर वरील रहिवाशी पुराव्यांसह सातबारा उतारा किंवा नमुना नंबर आठ किंवा सिटीसर्वे चा उतारा व त्याचे दुय्यम निबंधक यांचे शासकीय मूल्यांकन
3)जामीनदार खाजगी व्यवसाय असेल तर वरील रहिवासी पुराव्यांसह पॅन कार्ड, आधार कार्ड, व चालू मागील तीन वर्षांचे आयटी रिटर्न सोबत ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या जागेचा पुरावा शॉप ॲक्ट लायसन्स किंवा व्यवसाय नोंदणीकृत असेल त्यांचा पुरावा व्यवसायिक जागेचे लाईट बिल