<
भडगाव(प्रतिनिधी)- १७ जानेवारी रोजी सरसकट शाळा बंद केल्या व आँनलाइन शिक्षणामुळे झालेले शैक्षणिक, मानसिक, व शारिरीक नुकसानाबद्दल जयश्री पुर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले. पत्रात नमूद करण्यात आले कि मोठ्या प्रमाणावर आँनलाइन शिक्षणा मध्ये अडचणी येत आहे.
मागील दोन ते अडीच वर्षे पासुन मुले आँनलाइन वर्गात शिकत आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसाना सोबत शारिरीक, मानसिक त्रास सहन करत आहेत. आँनलाइन शिक्षणासाठी काही मुलांकडे मोबाईल फोन नाहीत, इंटरनेट सेवा ठीक नाही. शालेय समस्या मांडण्यात आल्या. आँफलाइन वर्ग शाळा महाविद्यालये लवकरच चालू करावेत, ज्या विद्यार्थीनी लसीचा प्रथम डोस घेतला आहे. अश्या विद्यार्थीना प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली. हे पत्र भडगांव, तहसीलदार मुकेश हिवाळे यांच्या मार्फत देण्यात आले. त्यावेळी उपस्थित अशुत्तोष पाटील, दर्शन शिंपी, प्रतिक पाटील, विराज पवार, ओम हिरे, संदिप पाटील , प्रतिक नरवाडे आदी विद्यार्थी उपस्थित होते.