<
भडगाव – (प्रतिनिधी) – तरसाच्या हल्ल्यात १२ शेळ्या, १ गायीचे वासरु ठार झाल्याची घटना तालुक्यातील सावदे शिवारात घडलीय. तर ३ शेळ्या गंभीर जखमी झाले असून यामुळे जवळपास १ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी आर. एस. जारवाल यांनी केला आहे.
भडगाव तालुक्यातील सावदे शिवारात मंगलाबाई कैलास परदेशी यांची शेती आहे. त्यांनी शेळ्या पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. शेतातच शेळ्यांसह जनावरांचा वाडा आहे. सावदे येथे १५ रोजी यात्रा होती. कैलास परदेशी हे शेतकरी रात्री ९ वाजता नेहमीप्रमाणे गुरांना चारा, पाणी करुन घरी गेले. शेतातील वाड्यात शेळ्यांसह जनावरे बांधलेली होती. रात्री तरसाच्या कळपाने या शेळ्यांच्या वाड्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात १२ शेळया, १ वासरी ठार झाली. तसेच ४ गंभीर शेळ्या बेपत्ता झालेल्या आहेत. सकाळी कैलास परदेशी म्हशींचे दुध काढण्यास शेतात गेले असता, ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. यात जवळपास १ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. या शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
महिंदळे शिवारात बिबट्याचा मुक्त वावर महिंदळे शिवारात मागील आठवड्यापासून लहान बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. शेतकऱ्यांना अनेकदा हा बिबट्या शेतात, शेत रस्त्यात, बांधावर मुक्तपणे वावरताना दर्शन देत आहे. काही दिवसांपूर्वी येथे पाळीव पशूंवर हिंस्र प्राण्यांनी हल्ला करून नुकसान केले होते. त्यामुळे या बिबट्याकडे वन विभागाने लक्ष घालून बंदाेबस्त करण्याची गरज आहे.
या हल्ल्यात १२ शेळया, १ वासरी ठार झाली. तसेच ४ गंभीर शेळ्या बेपत्ता झालेल्या आहेत. सकाळी कैलास परदेशी म्हशींचे दुध काढण्यास शेतात गेले असता, ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. यात जवळपास १ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. या शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.