यावल-(प्रतिनिधी) – दिनांक -१९-०१-२०२२ बुधवार रोजी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक दुर्गा मित्र मंडळ सावखेडासिम तालुका यावल येथे निशुल्क ई -श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास सुरुवात करण्यात आली सदर अभियानास सावखेडा गावातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण २७८ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी मा. श्री. डॉ कुंदन फेगडे, मा सौ बेबा बाई पाटील (सरपंच ) श्री मुबारक तडवी (उपसरपंच ) श्री विकास पाटील,श्री वसंत पाटील, श्री लक्ष्मण पाटील (ग्रामपंचायत सदस्य ) श्री भूषण पाटील, श्री कालू तडवी,श्री प्रकाश पाटील श्री. विनोद पाटील, श्री सलीम तडवी, श्री खतीब तडवी, श्री मुबारक तडवी आदींची उपस्थिती होती
सदरील अभियानास श्री दिनेश भाऊ पाटील श्री सलीम तडवी सर,सागर लोहार, विशाल बारी, जयवंत माळी, चेतन कापुरे यांचे योग्य सहकार्य लाभले











