Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

कांताबाई जैन जन्मजयंती, कांताई नेत्रालायच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आयोजित स्नेहाची शिदोरी वितरण करताना जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणण प्रमुख अभय जैन

जळगाव, दि. 19 (प्रतिनिधी) –
‘अडचणीत असलेल्यांना आपल्या स्वतःलाच अडचणी सोडवाव्या लागतात, परंतु अशा व्यक्तींना आपल्यापरीने मदत करणे म्हणजे त्याचे दुःख कमी करणे होय, अशी मदत करणे भाग्याचे काम असते अशी शिकवण आई कांताई यांनी आम्हाला दिली. जैन इरिगेशनच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना ‘स्नेहाची शिदोरी’ नक्की उपयोगी ठरेल’. असे मत जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते कांताबाई जैन यांच्या 84 व्या जन्म जयंती आणि कांताई नेत्रालयाच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात स्नेहाची शिदोरी वितरीत करण्यात आली. (ज्यात महिनाभर पुरेल इतक्या किराणा मालाचा समावेश आहे) यावेळी ते बोलत होते. छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. अंतरिक्ष महातो, डॉ. डॉली रणदिवे, एसटी कर्मचारी विजय पाटील उपस्थित होते.

कांताबाई जैन जन्मजयंती, कांताई नेत्रालायच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने ‘स्नेहाची शिदोरी’ वितरण कार्यक्रम व्यासपीठावर अभय जैन, डॉ. डॉली रणदिवे, डॉ. अंतरिक्ष महातो, विजय पाटील, जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी.

आरंभी कांताबाई जैन यांच्या स्मृतींना मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. जैन इरिगेशनचे सहकारी अनिल जोशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्नेहाच्या शिदोरी उपक्रमाबाबत सांगितले. यावेळी अभय जैन, डॉ. अंतरिक्ष, डॉ. रणदिवे, अमर चौधरी, अनिल जोशी, किशोर कुळकर्णी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्नेहाची शिदोरी वितरीत करण्यात आली. अमर चौधरी यांनी कांताई नेत्रालयाच्या सहा वर्षांच्या प्रगती व केलेल्या कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. शिदोरी घेणाऱ्या कुटुंबियांच्या वतीने श्रीमती यशोदा पांढरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी श्रद्ध्येय मोठे भाऊ भवरलालजी जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोकहो, आत्महत्या करू नका, आमच्याशी बोला(People, don’t commit suicide, talk to us)

Next Post

विटनेर माध्यमिक विद्यालयात लसीकरण-Vaccination at Whitner Secondary School

Next Post
विटनेर माध्यमिक विद्यालयात लसीकरण-Vaccination at Whitner Secondary School

विटनेर माध्यमिक विद्यालयात लसीकरण-Vaccination at Whitner Secondary School

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo