<
वावडदा (सुमित पाटील प्रतिनिधी) – ता.जि.जळगाव जवळच असलेल्या धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि.शेंदुर्णी या.जामनेर संचलित डॉ नि सु (जैन)ब्रम्हेचा माध्यमिक विद्यालय विटनेर ता जि जळगांव येथे आज दिनांक १९ जानेवारी 2022 रोजी शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या कोरना विषयक नियमांचे पालन करून आठवी नववी व दहावीच्या एकूण 72 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन कोरोनाची लस देण्यात आली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र म्हसावद मार्फत डॉ सागर नाशिककर, डॉ इसरार शेख,आरोग्य सेवक श्री सी यु भालेराव, आरोग्यसेविका सौ वंदना गोसावी , आशा वर्कर सौ किरण सुर्यवशी ,आशा सुपरवायझर जयश्री सूर्यवशी ,आशा वर्कर सौ मालती परदेशी यांचे सहकार्य लाभले.
तसेच गावातील पोलीस पाटील डॉ साहेबराव धुमाळ उपस्थित होते.
विद्यालयातर्फे सर्व डॉक्टर स्टाफ व गावातील पोलिस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. लसीकरण मोहीम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री प्रशांत गरुड सर,सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले