Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत संशोधकांनी उपक्रमशीलता आणावी – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत संशोधकांनी उपक्रमशीलता आणावी – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती अवघ्या विश्वाला आदर्शवत व अनुकरणीय असताना सद्यस्थितीत गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय शिक्षण पद्धतीत नव्या संशोधकांनी उपक्रमशीलता, नाविन्यपूर्णता आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्ज़ेदार शिक्षण पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन लेफ्ट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या कै. दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधनी अंतर्गत आयोजित पाच दिवसीय टारगेट पी एच डी प्रवेश पात्रता परीक्षेच्या कार्यशाळेत बोलत होते.

यावेळी कार्यशाळेचे समन्वयक तथा मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ एस व्ही जाधव, सहसमन्वयक प्रा दीपक पाटील व जळगाव, धुळे नंदुरबार येथील सुमारे 45 संशोधक उपस्थित होते.

दिनांक 17 जानेवारी ते 21 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित पाच दिवसीय ऑनलाइन पीएचडी एंट्रन्स टेस्ट वर्कशॉप मध्ये संशोधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला यात रिसर्च इन्स्टिट्यूट – डॉ सीमा बारी, टीचींग एटीट्यूट- प्रा अश्विनी जाधव, लॉजिकल रिझनिंग – प्रा शेरसिंग पाडवी, इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी – प्रा शुभांगी पाटील, मॅथेमॅटिकल रीझनिंग – डॉ सागर धनगर, जनरल अवेअरनेस ऑफ हायर एज्युकेशन सिस्टीम – डॉ राजेंद्र राजपूत आदींनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि दृक श्राव्य सादरीकरण केले आहे.

आणि उद्याच्या शेवटच्या सत्रात ईनव्हरमेंटल अवेअरनेस या विषयावर प्रा शिवाजी मगर व पेट पात्रता व नियम अटी या संदर्भात डॉ एस व्ही जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन कार्यशाळेत सहभाग घेता आला व विद्यापीठामार्फत नियोजित पेटची सर्वंकष तयारी करून घेता आली याबद्दल सहभागी संशोधकांनी समाधान व आनंद व्यक्त केला. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयातर्फे आयोजित केले जावेत अशी विनंतीवजा मागणी केली.

कार्यशाळेचे समन्वयक डॉ एस व्ही जाधव यांनी पाच दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत घेतले गेलेले सर्व विषयांवर पीपीटी सादरीकरण व अभ्यासासाठी आवश्यक माहिती पुरवण्याचे तथा भविष्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव परिक्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी अशाप्रकारे नव उपक्रम राबवले जातील असा मनोदय व्यक्त केला.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी – आमदार रावेर / यावल विधानसभा मतदार संघ, सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी महोदय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचे सर्व सदस्य मार्गदर्शन व परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्रीडा साहित्य मागणीसाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना आवाहन

Next Post

महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण संपन्न(Kovid vaccination completed at Maharana Pratap Secondary and Higher Secondary School)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo