<
भडगाव : प्रतिनिधी
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित टी .आर .पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडजी या शाळेत आज २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मतदार दिनाचे महत्त्व विद्यालयाचे प्राचार्य ए .एस. पाटील सर यांनी विषद करताना सांगितले कि मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे .एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार दिनाच्या माध्यमातून जनजागृती करून मतदारांना प्रोत्साहीत केले जाते . यासाठी मतदार दिनाचे महत्व अनन्यसाधारण आहे ..यावेळी मतदार दिनानिमित्त सामूहिकरीत्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची ” मतदार दिन शपथ “घेण्यात आली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसंगी एम .एस .देसले यांनी मतदान दिन का साजरा केला जातो हे सांगितले . शालेय विदयार्थी आपण देखिल भविष्यात मतदार होणार आहेत . त्यामुळे या मतदार दिनाचे महत्व आपल्याला शालेय जिवनापासूनच समजले पाहिजे या विषयी माहिती दिली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले .