<
जळगाव, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील बुधवार २६ जानेवारी २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : बुधवार २६ जानेवारी,२०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता पाळधी येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण, सकाळी ८.१५ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन, सकाळी ८.१५ ते ९ पर्यंत राखीव,
सकाळी ९.०८ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून पोलीस कवायत मैदानकडे प्रयाण, सकाळी ९.१३ वा. पोलीस कवायत मैदान येथे आगमन, सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण व राष्ट्रगीत, सकाळी ९.१७ ते ९.२७ वाजता मा. मंत्रीमहोदयांचे शुभेच्छापर भाषण, सकाळी ९.२७ ते ९.३१ वाजता स्वातंत्रय सैनिक व नागरीक यांना शुभेच्छा भेट, सकाळी ९.३१ ते ९.४५ वाजता चहापान, सकाळी १० वाजता रुग्ण व त्यांचे नातेवाईकाकरीता सुलभ शैचालयाचे उदघाटन, सकाळी १०.२० वाजता दंत विभागाच्या इमारतीचे नुतनीकरणाचे उदघाटन, सकाळी १०.४० वाजता कान, नाक, घसा विभागाच्या ऑडीयोमेटरी रुमचे उदघाटन, सकाळी १०.५० वाजता सुक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या म्युझियमचे उदघाटन, सकाळी ११.१० वाजता वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता सुलभ शौचालयाचे उदघाटन, सोईनुसार पाळधीकडे प्रयाण व राखीव, सायं ४ वाजता पाळधी येथून जामनेर पोलीस स्टेशन जामनेर कडे प्रयाण, सायं. ५ वाजता जामनेर पोलीस स्टेशन येथे आगमन व जामनेर पोलीस स्टेशन इमारतीचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार पाळधीकडे प्रयाण.