<
जळगांव(प्रतिनिधी)- सप्तरंग मराठी तर्फे दि 22 जानेवारी रोजी हॉटेल फोर सीजन्स ला आरोग्यसेवा रत्न पुरस्कार या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यात आरोग्यसेवेत ज्या डॉक्टरांनी मोलाची कामगिरी करून आपल्या जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. अश्या 22 डॉक्टर यांना आरोग्यसेवा रत्न पुरस्काराणे गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमला आपल्या खासदार उन्मेष पाटील, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक भास्कर राव डेरे, अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, अडव्होकेट संजय राणे, जळगाव ग्राहक संस्था अध्यक्ष रवींद्र लढा, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन उमा बागुल यांनी केले. सप्तरंग मराठीचे संचालक पंकज कासार यांनी आयोजन केले. आशुतोष पंड्या, पार्थ ठाकर, प्रथमेश कासार यांचे सहकार्य लाभले. जळगांव येथील डॉ. अमित भंगाळे. डॉ सई नेमाडे. डॉ नितीन चौधरी. डॉ स्नेहल फेगडे. डॉ दिनेश अग्रवाल. डॉ सुयश नवाल. डॉ. अमोल महाजन डॉ. रितेश पाटील, भुसावळ येथील डॉ नरेंद्र भोलाणे, डॉ विकास कोळंबे, डॉ. पराग भिरूड, डॉ. निलेश महाजन, डॉ रेखा पाटील, पाचोरा येथील डॉ प्रशांत पाटील, डॉ. भुषण मगर, डॉ. बाळकृष्ण पाटील, चाळीसगाव येथील डॉ मंगेश वाडेकर, डॉ. संदीप देशमुख, डॉ योगिता पाटील, डॉ प्रशांत भोंडे, डॉ नरेंद्र ठाकूर यांना आरोग्यसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.