<
आज (दि. २६) मंगळवार रोजी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, याकरीता अत्य आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्यात आली. हे अभियान एक दिवस सातोद व एक दिवस कोळवद असे दोन दिवस झाले हा कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर कोळवद व हनुमान मंदिर सातोद तालुका यावल येथे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास दुसऱ्या टप्यात पोचली सदर अभियानास कोळवद व सातोद गावातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
दिनांक २५व २६ ०१-२०२२ या दोन दिवसामध्ये एकूण ९७८ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला या अभियानाचे उद्घाटन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी हेमंत पाटील, परेश फेगडे, सागर महाजन, तुषार फेगडे, पराग फेगडे, तुषार चौधरी देवेन फेगडे सुभाष फेगडे किशोर चव्हाण, हर्षल सोनवणे मिलिंद शिरसाद आदींची उपस्थिती होती.
सदरील अभियानास धिरज भोळे सागर लोहार, विशाल बारी, हर्षवर्धन मोरे, तीर्थ राज भिरूड जयवंत माळी, चेतन कापुरे अक्षय राजपूत शुभम सोनवणे यांचे योग्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले.