<
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात आज सकाळी
(बुधवार,दिनांक २६जानेवारी,२०२२) ध्वजारोहण करण्यात आले. महापौरांनी सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी उप महापौर अॅड.सुहास वाडकर,सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत,माजी महापौर तथा नगरसेविका श्रीमती श्रध्दा जाधव,महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार,अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी तसेच सह- आयुक्त सर्व श्री. अजित कुंभार, मिलिन सावंत, चंद्रशेखर चौरे, उप आयुक्त प्रभात रहांगदळे,रमाकांत बिरादार,संजोग कबरे, श्रीमती चंदा जाधव, श्री. संजय कुऱहाडे, श्री. सुनिल गोडसे, अजय राठोर तसेच महापालिका चिटणीस (प्रभारी) श्रीमती संगीता शर्मा, खातेप्रमुख, महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
त्यानंतर, भारताच्या मा. राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे अग्निशमन सेवा पदक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्शिमन दलातील उपप्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. संजय मांजरेकर, प्रमुख अग्निशामक सर्व श्री. सुरेश पाटील, संजय म्हामुणकर यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहिर करण्यात आले. त्याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
तत्पूर्वी,भायखळा येथील महापौर निवासस्थानी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते आज, (बुधवार,दिनांक २६ जानेवारी, २०२२) सकाळी ७.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी ए, बी व ई प्रभाग समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे तसेच ‘ ई ‘ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. मनिष वळंजु तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.