<
भडगाव-(प्रतिनिधी) – तालुक्यातील वडजी या येथिल टी.आर .पाटील विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक ३०/०१/२०२२
वार रविवार रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त हुतात्मा दिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ए.एस. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात हस्तकला उद्योग याविषयी माहिती देण्यात आली.
तसेच वक्तृत्व स्पर्धेत अहिंसात्मक वृत्ती काळाची गरज याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी यांचा जिवनपट या विषयावर विदयालयात निबंध स्पर्धा घेण्यात आली . अनेक मुलांनी निबंध स्पर्धा यामध्ये आपला सहभाग नोंदविला.यावेळी प्राचार्य ए.एस.पाटील, वरिष्ठ शिक्षक बी .वाय. पाटील , ई .एम. पाटील, यांनी महात्मा गांधीचे कार्य , त्यांचा जिवनपट , स्वातंत्र्यसंग्रामातील गांधीजींची भूमिका , गांधीजीनी केलेल्या चळवळी, त्यांची अंहिसात्मक वृत्ती , दांडी यात्रा आणि हुतात्मा दिन साजरा करण्याच प्रयोजन , जे हुतात्मा झाले त्यांची माहिती या विषयी सविस्तरपणे आपले विचार मांडले . तसेच महात्मा गांधींच्या आवडीच्या प्रार्थना व गीत गायन घेण्यात आले व परिसर स्वच्छ करण्यातआला .सदर कार्यक्रमात राकेश पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले . यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात आपला सहभाग नोंदविला .